प्रतिजैविके संवेदनशीलता चाचणी (Antibiotic Sensitivity Test-AST/ABST)

 

प्रतिजैविके संवेदनशीलता चाचणी म्हणजे कोणत्या एंटीबायोटिक ला बैक्टीरिया संवेदनशील आहेत ते शोधने होय.

🦠🎯 ही चाचणी का करावी ❓❓❓🎯🦠

*आपण जनावरांवरील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी  विविध एन्टीबॉयोटिक्स वापरत असतो💉💊

*त्यामुळे सध्या बैक्टीरिया हे एन्टीबॉयोटिक्स प्रतीरोधक (Resistant)  दर्शवित आहेत

* पूर्वी जे एन्टीबॉयोटिक्स वापरून वेळेत योग्य परिणाम दिसायचा तो आता मिळत नाही 🤨

* परिणामी पशुपालकांचा उपचारावरील ख़र्च वाढला 💰

* तसेच दुधात त्यांचा अर्क उतरतो व मानवाच्या शरीराला हानी होते व   योग्य ते  रिझल्ट्स पण मिळत नाहीत

* उदा. दगडी कास  मस्टIयटीस (Mastitis) - दुग्ध व्यवसाय  उध्वस्त करणारा आजार)💉💊 यामधे भरपुर एंटीबायोटिक्स वापरून देखील उपचाराला दाद न मिळने व योग्य तो रिजल्ट न येणे 😐


* कारण अशा ठिकाणी रेजीस्टेंट निर्माण झालेला असतो😕

*योग्य एन्टीबॉयोटिक्स वापरण्यासाठी

*चाचणी केल्याने उपचारावरील खर्च कमी होऊन कासही पूर्ण निकामी होण्यापासून वाचवता येते

* प्रगत राष्ट्रामधे कोणतेही एंटीबायोटिक हे संवेदनशीलता चाचणी केल्यावरच वापरले जाते🧐त्यामुळे  जीवजंतूयांना प्रतिकार येत नाही.

* खरे तर Mastitis मस्टIयटीस (Mastitis)  , Metritis  (मेटरायटीस),  मधे सुरुवातीलाच चाचणी करुन घेतल्यास खर्च आणि कास व पिशवी दोन्हींही वाचतात आणि दुध उत्पादन व परिणामी गायीची/म्हशीची किंमत टिकून राहते...

 





🔬🧫 एन्टीबॉयोटिक्स सेंसिटिविटी टेस्ट-AST 🧫💉 ही फ़क्त दुधाचीच करतात का ❓🤔....... तर नाही, दुध व त्या व्यतिरिक्त रक्ताची (प्रदीर्घ आजारी जनावरांमधे), शेणाची (डायरिया मधे), लागवड न होणे (सबक्लिनिकल मेटरायटीस), पिशवीचा दाह होणे व योनीमार्गातून खराब स्राव येणे (मेटरायटीस) या स्रावाची चाचणी, न बरी होणारी जखम आणि पस व वारंवार इन्फेक्शन, सांध्यामध्ये सूज, पस आणि पाणी (वारंवार सांधेदुखी व सूज असणे), कान व नाकातून खराब स्राव येणे आणि पस व वारंवार इन्फेक्शन या करीता उपयुक्त ठरते.



दुधाचा नमुना तपासणीकरिता कसा पाठवावा 

  1. प्रथम ३-४ धारा काढणे
  2. सड निर्जंतुक द्रावणात बुडवणे
  3. सडाला लागलेले निर्जंतुक द्रावण टीशू पेपरने पुसणे
  4. स्वच्छ व निर्टूजंतुक अशा डबीमध्ये २ मिली दुध काढणे
  5. लेबल करून दुधाचा नमुना असलेली टूब थंड बर्फात १ तासात तपासणीस द्यावी.

.
















Comments

Popular posts from this blog

कुत्तों और बिल्लियों के लिए टीकाकरण कार्यक्रम: युवा और वयस्क पालतू जानवरों के लिए संपूर्ण मार्गदर्शिका

कुत्तों और बिल्लियों के लिए डीवर्मिंग शेड्यूल: युवा और वयस्क पालतू जानवरों के लिए संपूर्ण मार्गदर्शिका

बिल्ली और कुत्ते के पोषण के लिए संपूर्ण मार्गदर्शिका: अपने पालतू जानवरों को स्वस्थ और खुश रखें