उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घेण्यात यावी?
उन्हाळ्यामध्ये आपल्जया जनावरांची काळजी घेण्यासाठी खालील प्रकारचे विविध उपाय आपल्याला मदत करू शकतात:
जलपान व स्वच्छ जलसंचयन करणे:
- उन्हाळ्यामध्ये जनावरांचे चारा व पाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- जनावरांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या लसीमध्ये लाळ्या -खुरकूत ( तोंडखुरी-पायखुरी) , घटसर्फप व फऱ्या , तसेच काळपुळी, गोचीड-ज्वर या लसी देऊन घ्या .
- जनावरांना प्रतिदिन स्वच्छ व थंड पाणी देण्यात यावे.
वातावरणातील वाढलेली उष्णता व उष्ण तापमानात घ्यावयाची काळजी:
- उन्हाळा हा वातावरणातील उष्णता खूप प्रमाणात वाढवतो. त्यामुळे पशु उष्णतेच्या परिणामाने बाधित होतात.
- उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर दुध उत्पादन टिकून ठेवण्यासाठी गोठ्यातील थंड तापमान कसे नियंत्रित करता येईल याकडे लक्ष द्यावे .
चारा व्यवस्थापन व पशु आरोग्य :
- जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असली तर त्यांच्या आरोग्यावर व प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो.
- मुबलक हिरवा चारा, खुराक , क्षार मिश्रण, मीठ व गुळ इ. गोष्टींचा अंतर्भाव करावा.
Comments
Post a Comment