पशुमधील ब्रुसेल्लोसीस (Brucellosis )

 

+ ब्रूसेल्लोसिस (Brucellosis) +



 

ब्रुसेल्लोसीस (Brucellosis ) हा एक दूर्धर आजार  ब्रुसेल्ला अबॉरटस (Brucella abortus) या जिवाणु मुळे गाय व म्हैस तसेच  ब्रुसेल्ला  मेलेटेनसीस (Brucella melitensis)  मुळे शेळी व मेंढी  यांना होतो व त्याची चाचणी कोणी करत नाही .सध्या भारतात हा आजार वेगाने पसरत असून जागतिक आरोग्य संघटनेनुसार याबाबत भारत हा धोकादायक देशांच्या यादीत समाविष्ट आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा आजार जनावरांपासून माणसांमध्ये पसरतो व याचा सर्वाधिक धोका हा पशुवैद्यक व पशुपालकांना गर्भपात झाल्यावर वासरू ओढून काढणे, जार अड़कने सडणे व खराब स्राव व रंग प्राप्त जार ग्लोव्ज न घालता ओढणे व शिंतोडे डोळ्यात, नाका-तोंडात जाने आणि या आजाराने त्रयस्त असलेल्या जनावराचे  दुध प्यायल्याने  इतर मनुष्यास देखील होतो. पाशिमात्य देशात व इतर प्रगत देशामध्ये या झुनोटिक (zoonotic) आजारात फार महत्वाचे स्थान आहे कारण की मनुष्यामध्ये देखील जनावराप्रमाणे हा आजार पाय पसरतो व नर जातीच्या अंडाशयात घर करतो, गर्भपात, सांधेदुखी, रात्री घाम व ताप येणे इ. लक्षणे मनुष्यामध्ये येतात व आजारावर वर्षभर उपचार घ्यावी लागतात तरीपण शरीर १०० टक्के मुक्त होत नाही पैकी ब्रुसेल्ला  मेलेटेनसीस (Brucella melitensis) सर्वात घातक मानला जातो.     

जनावारांमधील आजाराची प्रमुख लक्षणे - जसे की गर्भपात (मुख्यत्वे गर्भधारणा दरम्यान शेवटच्या तिन महिन्यात गायी व म्हशीमध्ये गर्भपात वारंवार होणे), जार अड़कने सडणे व खराब स्राव व रंग प्राप्त होणे, वंधत्व व खराब स्राव, सांध्यांना सूज, नर जनावराने अशा मादी जनावरासोबत मिलन केल्यास इंनफेक्टेड होऊन अंडाशयाला सूज येणे, कमजोर वासरे, जार किंवा वार अडकणे, इंनफेक्टेड वासरे, करडे व कोकरे जन्मने व इतर जनावरांना लागण होणे, सांधेदुखी इ.*                     

आजाराचा प्रसार – प्रामुख्याने अडकलेला जार व तुकडे इतर जनावरांनी चाटणे, जाराचे  व गर्भपाताने-स्राव दूषित झालेले पाणी पिल्याने व चारा खाल्ल्यानेब्रुसेल्लोसीस (Brucellosis इन्फेक्शन झालेल्या बोकड, मेंढा, वळू व हाल्या किंवा कृत्रिम रेतना करिता वापरलेल्या . नराकडून कडून मादीला होतो, शरीरावरील जखमाद्वारे होतो आणि डोळ्याद्वारे देखील प्रसार होऊ शकतो*        

रोगनिदानकरीता - रक्त जल नमूने/ सिरम (Serum) तपासणीद्वारे इन्फेक्शन गाय व म्हैस, शेळी व मेंढी तसेच इन्फेक्शन झालेला बोकड, मेंढा, वळू व हाल्या यांचे रोगनिदान करून घ्यावे कारण की एका पशुला झालेली लागण गोठा किवा शेड मध्ये होऊन पूर्णपणे सर्व जनावरे इंफेक्टेड होण्याआधी व पशुपालक, पशुवैद्यक आणि इतर मनुष्य लागण होऊन पुढील धोका टाळण्यासाठी  रक्त जल नमूने पाठवा.


(कृपया रक्तजल/सिरम (Serum) हे  वरील तपासणीकरिता लाल रंग झाकण (CAP) असलेल्या PLAIN TUBE मधेच काढून पाठवावीत नाहीतर रोगनिदान प्रयोगशाळेत  घेतली जाणार नाहीत सदरील तपासणी करिता रक्त गोठलेले नंतर TUBE किवा SYRINGE मध्ये हे तयार रक्तजल/सिरम (Serum) आवश्यक आहे )

Comments

Popular posts from this blog

कुत्तों और बिल्लियों के लिए टीकाकरण कार्यक्रम: युवा और वयस्क पालतू जानवरों के लिए संपूर्ण मार्गदर्शिका

कुत्तों और बिल्लियों के लिए डीवर्मिंग शेड्यूल: युवा और वयस्क पालतू जानवरों के लिए संपूर्ण मार्गदर्शिका

बिल्ली और कुत्ते के पोषण के लिए संपूर्ण मार्गदर्शिका: अपने पालतू जानवरों को स्वस्थ और खुश रखें