पशुमधील ब्रुसेल्लोसीस (Brucellosis )
+ ब्रूसेल्लोसिस (Brucellosis ) + ब्रुसेल्लोसीस ( Brucellosis ) हा एक दूर्धर आजार ब्रुसेल्ला अबॉरटस ( Brucella abortus ) या जिवाणु मुळे गाय व म्हैस तसेच ब्रुसेल्ला मेलेटेनसीस ( Brucella melitensis ) मुळे शेळी व मेंढी यांना होतो व त्याची चाचणी कोणी करत नाही .सध्या भारतात हा आजार वेगाने पसरत असून जागतिक आरोग्य संघटनेनुसार याबाबत भारत हा धोकादायक देशांच्या यादीत समाविष्ट आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा आजार जनावरांपासून माणसांमध्ये पसरतो व याचा सर्वाधिक धोका हा पशुवैद्यक व पशुपालकांना गर्भपात झाल्यावर वासरू ओढून काढणे , जार अड़कने सडणे व खराब स्राव व रंग प्राप्त जार ग्लोव्ज न घालता ओढणे व शिंतोडे डोळ्यात, नाका-तोंडात जाने आणि या आजाराने त्रयस्त असलेल्या जनावराचे दुध प्यायल्याने इतर मनुष्यास देखील होतो . पाशिमात्य देशात व इतर प्रगत देशामध्ये या झुनोटिक (zoonotic) आजारात फार महत्वाचे स्थान आहे कारण की मनुष्यामध्ये देखील जनावराप्रमाणे हा आजार पाय पसरतो व नर जातीच्या अंडाशयात घर करतो , गर्भपात , सांधेदुखी , रात्री घाम...